बुधवार, जानेवारी ०६, २०१०

नव्या जगाची ही वाट

(उगाच र ला ट जोडायचा आमचा एक यत्न)
भेटला आपणास आज हा एकांत

विसरूया जग, नाही कशाची भ्रांत II१IIका आहोत आपण दोन ध्रुवांवर?

जवळी ये, धर हा माझा कर II२IIमोहरलो आहे स्पर्शाने तुझीया आज

नेत्रांत तुझ्या का ओथंबली लाज II३IIनको सोडूस कधी माझा हात

असू दे जन्मोजन्मीची साथ II४IIसरली अंधारी रात, बघ रम्य ही पहाट,

चल चालूया नव्या जगाची ही वाट II५II

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा