शनिवार, जुलै ०३, २०१०

ब्राझिल वर्ल्डकपच्या बाहेर पडल्यामुळे तसेही या मॅच मधे फारसे लक्ष नव्हतेच...


तसेही मॅच घाना आणि उरुग्वे यांचा मध्ये होती...

घाना आफ्रिकेतला उरलेला शेवटचा स्पर्धक देश... मॅचचे पहिले ९० मिनिट आणि एक्स्ट्रॉ टाईम चे २९ मिनिट चांगले झालेच.. दोन्ही संघ आक्रमक होतेच आणि शेवटच्या काही मिनिटांत तर घाना सतत उरूग्वेच्या हाफमध्येच होता. पण खरा थरार घडला तो सामना संपायला काही सेकंद बाकी असताना... घानाला एक फ्री कीक देण्यात आली. स्टीव्हन अ‍ॅपीया ने केलेला प्रयत्न उरूग्वेच्या सोरेझने अडवला , पण तो हाताने. आणि अगदी मॅचच्या शेवटच्या सेकंदाला घानाला एक पेनल्टी कीक आणि सोरेझला रेड कार्ड मिळाले.असीमोल ग्यान, घानाचा सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर ही पेनल्टी घ्यायला उभा राहिला आणि घानाच्या बाजूने मैदानात विजयाचा जल्लोष सुरू झाला. सार्‍या आफ्रिकेच्या आशा खांद्यावर घेऊन ग्यानने ही कीक घेतली पण हाय रे दुर्दैवा.. बॉल साईडबारला जाऊन भिडला.. आणि रेड कार्ड घेऊन बाहेर जाणार्‍या सोरेझने आणि अर्थातच उरूग्वेच्या सर्व समर्थकांनी जल्लोष केला..
 

सामना अर्थातच पेनल्टी शूट आऊट मध्ये गेला आणि एक सुवर्णसंधी गमावल्यानंतर जे होते तेच झाले... घानाने सामना गमावला.. ग्यान हिरो टू झिरो झाला.. त्याचबरोबर धिस टाईम फॉर आफ्रिका असे गाणे म्हणत आफ्रिकेतला एखादा संघ जिंकावा ही आशा संपुष्टात आली.