आज तिचा वाढदिवस.........
काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्रीच्या बियर मुळे उशिरच झाला. धावत पळत माझ्या जागेवर पोहचलो तर आजुबाजुचा जागेवरचे सगळे गायब, मरुदे म्हण्त त्तसेच जागेवर बसलो व मि पा उघडले. थोड्या वेळाने आमचे साहेब प्रकटले, आमची मि पा ची खिडकी उघडिच होती. त्याकडे रागाने बघत म्हणाले "आज तारिख काय माहिती आहे तुला???" (आमचे साहेब व आम्ही शुद्ध मराठी मधे बोलतो सगळ्या भैयांसमोर) माझ्या चेहेर्यावर एक खुप मोठे प्रश्नचिन्ह जे मला पण दिसत होते. मनात आले "सकाळी सकाळी ह्याला काय झाले" (मनात थोडी विषेशणे लावली होति आम्हि, पण आम्हला संशय आहे की तो पण इकडे वाचनमात्र आहे.) साहेब जोरात आवाज करुन आमच्यावर ओरडले "अरे आज २४ तारीख आज आपला रिव्हु होता." "झाला???" अचानक माझ्या तोंडातुन निघुन गेले, आणि व्ह्यायचे तेच झाले त्याने मला शिव्यांचि लाखोळी वाहीली व निघुन गेला. बाजुच्या खुर्चीवर बसणार्याने लगेच आपले नाक खुपसले "यार २४ मार्च लक्षात नाही ठेवता येत का???झाले सकाळी सकाळी जे आठवु नये ते आठवले. आज २४ मार्च म्हणजे उद्या तिचा वाढदिवस.
मन आठवणीत रमायला लागले, डोळ्या समोर आला तो मागचा २४ मार्च, काय काय केले होते मी तुला सरप्राईज करायला. बारा वा़जता तझ्या घरि केक घेउन आलो होतो. आठवतय तुला??? काळ वेळ विसरुन मी हरवलो तुझ्या आठवणीत, तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण. तासन तास तुझ्याशी ते फोन वर बोलत बसणे, तुझ्या सोबत समुद्र किनार्यावर घालवलेल्या ती संध्याकाळ. तुझ्या सोबत खाल्लेली ति तिखट मिसळ, तिखट मिसळ खाउन तुझे लालबुंद झालेले नाक. असेच आठवत होतो सर्व काही. सहजच हात फोन कडे गेला आणि इछ्छा झाली तुला फोन लावायची. तुला फोन लावणार तितक्यात तु आलिस डोळ्या समोर सांगताना "आपल्या मधले सगळे संपलय, आज पासुन आपले नाते ते फक्त मैत्रीचे.
तिला फोन लावावा की नाही हे द्वंद मनात चालु असतानाच परत आमच्या साहेबाने पकडले. माझ्या हातात फोन, मी फोन कडे पाहात बसलो आहे, समोर मि पा ची खिडकी उघडि आहे, आणि साहेब माझ्या जागेवर. वा!!! काय छान योग आहे हा????? साहेबाने आम्हला परत एकदा आपादमस्तक न्याहाळ्ले. आणि आज्ञा दिली "कम विथ मी एन वॉर रुम" परत एक प्रश्नचिन्ह. आमच्या खुद के साथ बाता सुरु झाल्या. "ईग्रंजि मधे बोलतोय??? आणि वॉर रुम मधे??? आता कोणाशी युद्ध करायचे वॉर रुम मधे जाउन??? कसे बसे तिथे जाउन बसलो तर साहेब सुरु झाले. "निखिल आज तब्येत बरी नाही का?? सकाळ पासुन खुप विचित्र वागत आहेस??? मि काही तरि थातुरमातुर उत्त्तर दिले. साहेबाने पुढची गुगली टाकली "आज जर बरे वाटत नसेल तर लवकर घरि जा" मी मनात " काय काम आहे लवकर सांग आता" "फक्त जायच्या आधी तो रिपोर्ट मला पाठवुन दे". कसे बसे बाहेर आलो व कामाला लागलो. नेहमी प्रमाणे स्वःताची समजुत घातली. काम तसे फार मोठे नव्हते पण संपवे पर्यंत पाच वाजले.
कसे बसे स्टेशन वर आलो, लवकर ऑफिस मधुन निघाल्या मुळे तेथे गर्दी नव्हतिच. चहावाल्या जवळचे बाकडे रिकामे होते. आठवत आहेत का तुला ह्या इथेच बसुन कितिदा तु माझी वाट पाहीलि होतिस. उशिर झाला म्हणुन धावत पळत मी आल्या वर तुझे ते खोटे रागवणे. मग हळुच जेव्हा मी पुला वरील आज्जी कडुन घेतलेले गुलाबाचे फुल तुला द्यायचो तेव्हा जे काही भाव तुझ्या चेहर्यावर असायचे ते मी आजपण विसरलो नाहिये. मागच्या तुझ्या वाढ्दिवसाच्या आद्ल्या दिवशि इथेच आपण भेटलो होतो. परत एकदा हात खिश्या मधे गेला, फोन बाहेर आला. परत तेच आले डोळ्या समोर मी तिथेच बसुन राहीलो.
थोड्यावेळानी बघतो आजुबाजुला अंधार पडला होता . तसेच उठुन मी ट्रेन पकडली व घरि निघुन आलो. घरि आल्या आल्या मला लक्षात आले की आज आपण एकटेच आहोत. रुममेट तर गावाला गेला आहे. तसाच निरिछेने बसुन राहीलो. सुचत नव्हते काही म्हनुन उचलला फोन, तुला लावणार होतो ग पण टाळुन जुन्या मित्राला लावला. ज्या मित्राशी एक वर्षात बोललो नव्हतो त्याला फोन लावला. तुझा सोडुन सगळ्या विषयावर मी मो़कळे पणे बोललो. तुझा विषय निघाल्यावर नेट्वर्क नाही म्हणुन फोन काटला. नउ वाजताच घरात अंधार करुन झोपलो. झोप येत नव्ह्ति तरि तसाच पदुन राहीलो. रात्री बारा चे टोल पडल्यावर परत फोन कडे हात गेला, समजवले मनाला नवर्या सोबत करत असशील साजरा. पण माझे मन आले तुझ्या घरी केक घेउन. तुला नवर्या सोबत आनंदी बघुन तसेच आले परत फिरुन.
मनाला समजावणे सुरु झाले , कि ति आता तिच्या नवर्या बरोबर सुखी आहे. आता तिच्या आठवणी काढुन काही एक फायदा नाहीये.आज सकाळी वेळेवर ऑफिसला आलो.सकाळ पासुन टाळत आलो तुला फोन करायचे. समजावत आलो की विसर तिला आता. हा काय वेडेपणा लावला आहे काल पासुन?? गेले काही दिवस तर तु तिची आठवण सुद्धा काढन नव्हतास. खालच्या ओळी वाचल्या आणि मनाला शांत करायचा प्रयत्न केला.
कुणाची ईतकी ही ओढ नसावी ,
की पदोपदी त्याचीच वाट बघावी !
त्याची वाट बघता बघता ,
आपलीच वाट दिशाहीन व्हावी !
असाच दिवस घालवुन आज घरी पोहचलो अजुन तिला फोने केला नव्हता. आता फोने कडे हात जातही नव्हता. घरी आल्या वर असेच काय करायचे बसुन म्हणुन ह्या रवीवारी घेतलेल्या सि डी ची पिशवी घेतली, त्यातुन हातात आली ति, गुलजार आणि सौमित्र ह्यांचा कवितेची सी डि "तरिही". ह्यातल्या एका कवितेवर मी थबकलोच. ति कविता खाली देत आहे.
उद्या तिचा वाढदिवस मनात नाहीच धरायचा
खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा
उद्या तिचा वाढदिवस खुप खुप चालायच
जुने जुने मित्र शोधुन नविन सगळे बोलायच
स्वःता सोबत बोलतानाही उगाच नाही अडायच
संध्याकाळी गर्दी मधुन बाहेर नाही पडायच
गजबजलेल्या प्लॅट्फॉर्म वरती उगाच बसुन रहायच
घरी चाललेया माणसांकडे आपुलकीने पाहयच
गुड्डुप्प करुन काळोख आज लवकर झोपुन जायच
आज मोडायच नियम रात्र जागायच
पण खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा
बारा नंतर तिचि खुप आठ्वण येत राहिल
मन उठुन केक घुन तिच्या घरी जाईल
जणु काहिच घडल नाही अशिच ती पाहिल
नवरा घर मुल ह्यांचात पुन्हा रमुन जाईल
आपण पुन्हा रस्त्यावरती एकटे एकटे असतो
मध्यरात्री बारमधे मु़काट पिउन बसतो
आज पासुन असल जगण मुळिच नाही जगायच
आता पुन्हा कधिच वळुन मागे नाही बघायच
आज पासुन आपलाच हात हातात धरायचा
खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा
ह्या कवितेचा शेवटी सि डि मधे एक फोन वाजतो.हा लेख लिहित असताना माझाही फोन वाजला. सहज पाहीले तर तिचा नं होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा